Alert! या कारणांमुळे तुमचे वजन वाढू शकते, जाणून घ्या 8 टिप्स
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत वजन कमी करणे अनेकांसाठी एक मोठे आव्हान बनले आहे. वजन कमी करणे म्हणजे फक्त दुबळं दिसणे नसून, ते निरोगी आयुष्य जगण्याचे एक महत्त्वाचे अंग आहे. जास्त वजनामुळे विविध आरोग्य समस्या जसे की हृदयरोग, उच्च रक्तदाब, मधुमेह, सांधेदुखी, निद्रानाश, ताण-तणाव यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे संतुलित वजन ठेवणे हे आपल्यासाठी फायद्याचे आहे. वजन कमी करण्यासाठी नियमितता आणि सकारात्मकता ह्या दोन गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत. चला तर मग Weight कमी करण्याचे काही प्रभावी मार्ग जाणून घेऊया.
१. योग्य आहार घ्या
संतुलित आहार
संतुलित आहार म्हणजे फक्त दररोज एका प्रमाणात जेवणे असा होत नाही तर, आपल्या आहारामध्ये सर्व पोषक घटकांचा समावेश असने असा होतो. प्रथिने, कार्बोहायड्रेट्स, फायबर, जीवनसत्त्वे, मिनरल्स, आणि योग्य प्रमाणात फॅट हे सर्व आपल्या आहारात आवश्यक आहेत. त्यामुळे वजन कमी करण्याचा प्रयत्न करताना फक्त एकाच घटकावर लक्ष न देता सर्वांचे योग्य प्रमाण ठेवने अत्यंत आवश्यक आहे या गोष्टींचा वजन कमी करण्यामध्ये मोठा फायदा होतो.
ताजे फळे आणि भाज्या
फळे आणि भाज्यांमध्ये कमी कॅलरीज असतात आणि त्यात भरपूर फायबर पण असते, फायबर मूळे पचनक्रिया सुद्धा सुधारते. फळांमुळे आपले पोट पण लवकर भरते त्यामूळे जास्त खाण्याची गरज सुद्धा भासत नाही. कमी कॅलरीज आणि भरपूर फायबर मुळे दीर्घकाळा पर्यन्त भूक लागत नाही.
धान्ये
आपण भारतीय, आहारामध्ये दररोज चपाती, भाकरी च्या माध्यमातून धान्य घेतच असतो. गहू, ज्वारी,बाजरी, ओट्स, ब्राऊन राइस हे फायबरचे उत्तम स्त्रोत आहेत. फायबरमुळे आपले पोट लवकरच भरते, त्यामुळे आपण कमी खातो. त्यामूळे आपल्याला अधिकच्या कॅलरीज बर्न करण्याची गरज नाही. आपल्या
साखर आणि मिठ कमी करा
आपल्याला जर मिठ आणि साखर जास्त खायची सवय असेल तर मिठ आणि साखर खाणे टाळा, साखर आणि मिठ खाल्ल्याने Weight वाढण्याची शक्यता अधिक वाढते. साखरेऐवजी शुद्ध मध, गूळ किंवा इतर नैसर्गिक गोड पदार्थ वापरू शकता. आणि
२. नियमित व्यायाम
कार्डिओ व्यायाम
कार्डिओ व्यायाम जसे चालणे, धावणे, सायकलिंग, पोहणे हे वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात. दररोज कमीतकमी ३० मिनिटे व्यायाम करा.
वजन उचलणे
वजन उचलण्याने मसल्स तयार होतात, ज्यामुळे स्टॅमिना वाढतो. मसल्स तयार झाल्याने शरीराच्या बेसल मेटाबॉलिक रेट (BMR) मध्ये वाढ होते, ज्यामुळे अधिक कॅलरीज बर्न होतात. शक्यतो आपल्याला जेवढे वजन झेपतं तेवढेच उचलण्याचा प्रयत्न करा.
योग आणि स्ट्रेचिंग
आपण रोज 30 मिनिटे तर योगा आणि स्तरेटचिंग करायला हवी योगा केल्याने केवळ शरीरालाच नाही तर मनालाही शांतता मिळते. शरीराच्या स्नायूंना ताण बसतो आणि वजन कमी होण्यास मदत होते.योगा आसन जसे की सूर्यनमस्कार, उत्तानासन, वज्रासन हे वजन कमी करण्यात उपयुक्त ठरतात.
Heart Health: ह्रदयाच्या आरोग्यासाठी सोपे उपाय आणि प्रभावी 10 योग आसन
३. हायड्रेटेड राहा
पाणी प्या
शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित ठेवण्यासाठी नियमित पाणी पिणे आवश्यक आहे. पुरेसे पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर पडतात आणि पचन तंत्र सुधारते. जेव्हा आपण पाणी पितो, तेव्हा ते पोट भरण्यास मदत करते आणि अधिक खाण्याची गरज राहत नाही.
गरम पाणी
गरम पाणी पिण्याने पचन सुधारते आणि शरीरातील चरबी कमी होण्यास मदत होते. सकाळी उठल्यावर एक ग्लास गरम पाणी पिणे फायदेशीर ठरते.
४. पुरेशी झोप घ्या
योग्य प्रमाणात झोप घेतल्याने शरीराला आणि मनाला विश्रांती मिळते, ज्यामुळे ऊर्जेची पातळी वाढते. झोप पूर्ण न झाल्यास शरीरातील हार्मोनच्या पातळीवर परिणाम होतो, ज्यामुळे Weight वाढण्याची शक्यता असते. किमान 6-8 तास झोप घेतलीच पाहिजे ज्यामुळे तुमचे शारीरिक आरोग्य चांगले राहील पन मानसिक आरोग्य सुद्धा सुधारेल आणि ताण तनाव नियंत्रणात येऊ शकतं.
५. खाण्याची वेळ आणि प्रमाण
नाष्टा न चुकवणे
नाष्टा हा दिवसातील सर्वात महत्त्वाचा आहार आहे संपूर्ण दिवसासाठी शरीराला ऊर्जा मिळण्यासाठी नाष्टा महत्वाचा आहे. नाष्ट्यामध्ये मोड आलेले कडधान्य, सॅलेड, दूध किंवा ज्यूस असलेला खूपच चांगले.
रात्रीचे जेवण हलके ठेवा
रात्रीचे जेवण हलके असावे, कारण सूर्यास्ता नंतर शरीरातील जठराग्नि मंदावते त्यामूळे रात्री शरीराची पचन क्षमता कमी असते. जड अन्न घेतल्यास ते पचायला अवघड जाते आणि त्यामुळे वजन वाढण्याची शक्यता असते आणि अपचन झाल्याने गॅस आणि असिडिटी सुद्धा होऊ शकते.
६. ताण-तणाव कमी करा
सर्वांच्या जीवनामध्ये धावपळ आहे त्या धावपळीमुळे थोडा का होईना तनाव येवू शकतो त्यामूळे शरीरात ताण-तणाव हार्मोनची पातळी वाढते, ज्यामुळे Weight वाढू शकते. म्हणून रोज ध्यान, श्वासोच्छवासाचे व्यायाम, योग यांसारख्या गोष्टींचा वापर करून ताण कमी करण्याचा प्रयत्न करा.
७. नैसर्गिक आणि घरगुती उपाय
लिंबूपाणी
लिंबामध्ये अँटीऑक्सिडेंट्स असतात, जे शरीरातील विषारी घटक बाहेर काढून पाचण सुधारन्यात मदत करतात. त्यामूळे वजन कमी करण्यामध्ये मदत होते रोज सकाळी उपाशी पोटी एक ग्लास लिंबूपाणी पिणे फायद्याचे ठरते.
आल्याचा चहा
आल्यात सुद्धा अँटीऑक्सिडेंट्स असतात, जे शरीरातील चरबी कमी करण्यात मदत करतात. आल्याचा चहा पिण्यामुळे पचन सुधारते आणि Weight कमी होण्यास मदत होते.
दालचिनी
दालचिनी पाण्यात उकळून प्यायल्याने Weight कमी होण्यास मदत होते. दालचिनी मध्ये शरीरातील मेटाबॉलिजम वाढवण्याची क्षमता असते.
मेथीदाणे
मेथीच्या दाण्यांमध्ये फायबर भरपूर असते. रात्री मेथीदाणे पाण्यात भिजवून ते पाणी सकाळी रिकाम्या पोटी प्यायल्यास पचन सुधारते.
८. सतर्क राहा
कॅलरीचे मोजमाप करा
आपल्याला दररोज किती कॅलरीज आवश्यक आहेत, हे ठरवून त्यानुसारच आहार घ्या. त्यामुळे जास्त कॅलरीज टाळण्यास मदत होईल.
स्वतःवर नियंत्रण ठेवा
वजन कमी करणे हा दीर्घकाळाचा प्रवास आहे. दररोजचा आहार आणि व्यायामावर नियंत्रण ठेवा. कोणत्याही खाद्य पदार्थाच्या बाबतीत प्रमाणाचा विचार करा. चवीपोटी कोणतेही पदार्थ खाऊ नका ज्यामुळे नियंत्रण नसेल तर विनाकारण वजन.
वजन कमी करण्याच्या प्रवासात वेळोवेळी आपल्या Progress चा आढावा घ्या. आपली Progress ट्रॅक करणे हे आत्मविश्वास वाढवते आणि यश मिळवण्यास प्रेरित करते.
वजन कमी करणे म्हणजे थोडीशी लांब Process आहे तात्पुरतं असे काहीच नाही, तर तो दीर्घकाळासाठी स्वीकारलेला जीवनशैलीत बदल आहे. योग्य आहार, नियमित व्यायाम, तणाव नियंत्रण, आणि Positive Mindset ठेवून आपण सहज वजन कमी करू शकतो. आपले शरीर आणि आरोग्य हे आपलेच आहेत, त्याची योग्य काळजी घेणे आपल्याच हातात आहे.